" वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे " असे संत तुकाराम यांनी लिहून ठेवले आहे . पण दिवसेंदिवस हे सगेसोयरे, ही अनमोल वृक्षसंपदा कमी कमी होत चालली आहे. आपल्या मालेगांव शहर आणि तालुक्याचा विचार केल्यास दर उन्हाळ्यात येथील ४० ते ४५ अंशापर्यंत पोहोचणारा पारा आपले जगणे असह्य करून टाकतो. यास जबाबदार कोण ? शासन की समाज म्हणून स्वतः आपण ? प्रत्येक गोष्टीची जबाबदारी शासनावर ढकलून कसे चालेल ? नागरिक म्हणून आपलीही काही सामाजिक बांधिलकी आहे की नाही ?|| टाळावया आपत्ती, जोपासा वनसंपत्ती ||
आपण आपल्या मुलांसाठी, भावी पिढीसाठी बँकेत पैसा साठवतो, घरदार बनवतो, त्यांना शिक्षण देतो, व्यवसाय जोपासतो ना; मग त्यांचे जीवनमान सुसह्य आणि बहारदार होण्यासाठी त्यांना निसर्गशिक्षण द्यायला हवे, वृक्षारोपण-जतन-संवर्धनाचा वारसा द्यायला हवा ना ! चला तर मग ओसाड उजाड होत चाललेल्या मालेगांव शहरांत वृक्षारोपण करूया !!!
आता फक्त एकच ध्यास...व्हावे मालेगांव हिरवे ; हीच आस !
त्यासाठी आपण या ध्यासपर्वात सामील होवू शकता. दात्याने दिलेल्या दानातून एक देशी पर्यावरणपूरक, पर्यावरणस्नेही झाड व झाडाभोवती संरक्षक पिंजरा लावू या ! या पिंजऱ्यावर दात्याच्या इच्छेनुसार (कुणाच्या स्मरणार्थ / वाढदिवसानिमित्त / दुकानाचे नांव / संस्था / सुविचार) नांव दिले जाईल. सदर रोपट्याच्या देखभालीची जबाबदारी आमची.
- पिंजऱ्याचा नमूना -
* सक्रीय सहभाग *
* सक्रीय सहभाग *
आपण लावणार असलेली पर्यावरणपूरक झाडे -
अर्जुन, अमलताश (बहावा), पापडा, लोखंडी, हिरडा, बहेडा,पुत्रंजीव, सप्तपर्णी (सातवीन), काळा कुडा, पांढरा कुडा, फालसा, कुसुम, वरुण (वायवर्ण), वड, पिंपळ, पळस, टेटू, रगत रोहीडा, सालई, रानजाई, उंबर, काटेसावर, रिठा, देशी बदाम, सीताअशोक, अंजन, शिवण, भोकर, कडूनिंब, कदंब, सोनसावर, कळम, ताम्हण, सोनचाफा, वरस, आसाना, पांगारा, आकाशनीम (बूच), चिंच, कैलासपती, तुतु, फणस...
" निसर्गाचं देणं "
अमरावतीला रस्त्याच्या कडेला फुललेला ' पळस '.... |
दिल्लीतील एका मुख्य रस्त्याच्या मध्ये असलेली बहाव्याची झाडं... |
No comments:
Post a Comment